भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली नव्या कार्यकारिणीची घोषणा…
अमळनेर:- भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा नुकतीच झाली असुन यात प्रदेश उपाध्यक्षपदी विधान परिषदेच्या माजी आमदार श्रीमती स्मिता उदय वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर कार्यकारिणीत सक्षम आणि क्रियाशील आणि संघटनात्मक कौशल्य अवगत असणाऱ्या पदाधिकारीना स्थान देण्यात आले आहे.या नियुक्तीने अमळनेर मतदारसंघासह जळगाव जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरणात निर्माण झाले आहे. विद्यार्थी दशेपासून विद्यार्थी परिषद व चळवळीच्या माध्यमातून भाजप परिवाराशी जोडल्या गेलेल्या स्मिता वाघ कालांतराने भाजपाकडून निवडणूक लढवून जिल्हा परिषदेच्या सदस्य झाल्यात तेव्हापासून त्यांचा आलेख चढताच राहिला, जिल्हा परिषद अध्यक्षपदा पर्यंत पोहोचल्यानंतर कामाची पावती म्हणून विधान परिषद सदस्य पदाची मोठी संधी त्यांना पक्षाने दिली,सक्षम लोकप्रतिनिधी म्हणुन त्यांचा नावलौकिक असताना त्यांच्यात संघटन कौशल्य हा मोठा गुण असल्याने पक्ष कायम त्यांना संघटनात्मक जवाबदाऱ्या देत राहिला दरम्यानच्या काळात जळगाव जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष, प्रदेश महिला अध्यक्ष, मुख्य कार्यकारिणीत प्रदेश चिटणीस नंतर उपाध्यक्ष व आता पुन्हा नव्या कार्यकारिणीत प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करून मोठी जवाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे.
सदर नियुक्तीमुळे भाजप कार्यकर्त्यामध्ये उत्साह संचारला असून एकप्रकारे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बळकटी मिळाली आहे.सदर नियुक्तीबद्दल स्मिता वाघ यांचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे, जिल्हयातील सर्व आमदार, खासदार, जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी स्मिताताईंचे अभिनंदन केले आहे .