पुणे येथे सरपंच परिषदेची राज्यस्तरीय पदाधिकारी कार्यशाळा संपन्न…
अमळनेर:- अमळनेर तालुका सरपंच परिषदेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून तालुका अध्यक्षपदी सात्री येथील महेंद्र शालिग्राम बोरसे यांची फेर निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी बाळू भाऊ धुमाळ तर जिल्हा सचिवपदी श्रीकांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान गेल्या दोन वर्षापासून महेंद्र शालिग्राम बोरसे यांनी उत्तम काम केले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊनच पुन्हा त्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.
पुणे येथे सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राची राज्यस्तरीय पदाधिकारी कार्यशाळा सोमवारी ८ मे रोजी पद्मश्री पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, प्रदेश सरचिटणीस अॅड. विकास जाधव, राज्य विश्वस्त राणीताई पाटील, अश्विनीताई थोरात, राजीव पोतनीस आनंदराव जाधव, किसन जाधव, शिवाजी आप्पा मोरे, पांडुरंग नागरगोजे, सुधीर पठाडे, नारायाण वनवे, सुप्रियाताई जेथे, राज्य प्रसिद्धी प्रमुख संजय जगदाळे आदी उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यकारिणीची निवड करण्यात आली. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे मान्यवरांनी स्वागत केले.
या कार्यकारिणीत उपाध्यक्ष भास्कर आप्पाजी पाटील (सुंदरपट्टी), योगेश अशोक पाटील (पिंपळे बुद्रुक), कार्याध्यक्ष कैलास प्रल्हाद पाटील (शहापूर), सचिव सतीश पाटील (जुनोने), सहसचिव जितेंद्र प्रेमसिंग पाटील (कळमसरे), संघटक गजेंद्र रमेश जाधव (रामेश्वर), सहसंघटक प्रवीण यशवंत पाटील (गोवर्धन), कोषाध्यक्ष भूपेंद्र नानाभाऊ पाटील (झाडी), मार्गदर्शक हिरालाल पवार (खेडी प्र), संघटक कैलास भगवान पाटील (लोन बुद्रुक), सदस्य सतीश आत्माराम पाटील (खापरखेडा), किशोर एकनाथ पाटील (आरडी), गोपाल चंदू पाटील (आटाळे), जाधवराव भालचंद्र (ढेकूसिम), चेतन काशिनाथ पाटील (वाघोदा), मच्छिंद्र विठ्ठल पाटील (खडके), राजेंद्र दिनकर पाटील (रामेश्वर बुद्रुक), अशोक विनायक पाटील (भरवस), कुलदीप कृष्णा पाटील (कंडारी) यांचा समावेश आहे.
महिला तालुका कार्यकारिणी अशी…
महिला तालुका कार्यकारणीच्या अध्यक्ष शीतल महेंद्र पाटील (पातोंडा) यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी भारतीय शशिकांत साळुंखे (जळोद), शुभांगी सचिन पाटील (पाडळसरे), कार्याध्यक्ष वैशाली प्रवीण पाटील (निसर्डी), कोषाध्यक्ष जयश्रीताई अरुण देशमुख (खवशी), सचिव वैशाली जितेंद्र पाटील (टाकरखेडा), सहसचिव रेखा राजेंद्र पाटील (दहिवद), संघटक आशाबाई ज्ञानदेव पाटील (खेडी खुर्द सिम), सहसंघटक सविता सतीश पाटील (रामेश्वर), सदस्य दगूबाई भीमराव पाटील (पिंपळे बुद्रुक), प्रसिद्धी प्रमुख जयश्री बाबुराव पाटील (दहिवद) यांचा समावेश आहे.