अमळनेर:- तालुक्यातील वावडे येथील ५० वर्षीय इसम बेपत्ता झाला असून हरविल्याची तक्रार त्याच्या भावाने दाखल केली आहे.
याबाबत अनिल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वावडे येथील सुनील व्यंकट पाटील हा त्याचा भाऊ वेडसर सारखा वागत असून त्याच्यावर धुळे व मुंबई येथे उपचार सुरू होते. याआधी तो घरातून निघून गेला होता मात्र दोन दिवसात परत येत होता. मात्र १ फेब्रुवारी रोजी तो घरातून बाहेर पडला असून आजतागायत परत आलेला नाही. दोघी भावांनी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर शोध घेतला, बेवारस मृतदेहांची पाहणी केली. मात्र सुनील अद्याप मिळून आला नसल्याने मारवड पोलिसांत हरविल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.