अमळनेर तालुका राजपूत एकता मंचतर्फे राजपुत बांधवाना उपस्थितीचे आवाहन…
अमळनेर:- संभाजी नगरात सकल राजपुत समाज,महाराष्ट्र राज्य च्या वतीने विर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलन 2023 चे आयोजन दि 14 मे रोजी करण्यात आले असून यावेळी समस्त राजपूत समाजाने मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन अमळनेर तालुका राजपूत एकता मंच तर्फे करण्यात आले आहे.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान, खडकेश्वर, छत्रपती संभाजीनगर येथे दुपारी 4 वाजता हे संमेलन होणार आहे.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ना. राजनाथ सिंहजी(संरक्षण मंत्री भारत सरकार), एकनाथराव शिंदे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,तसेच रावसाहेब दानवे(केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री), साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर, ना. भागवत जी कराड (केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, अजितदादा पवार (विरोधीपक्ष नेते) अंबादास दानवे ,अतुल सावे, अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या संमेलनात राजपूत भामटा / परदेशी भामटा जातीतील जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सुरळीत देण्यात यावे,वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह आर्थिक महामंडळाची स्थापना करावी, विरशिरोमणी महाराणा प्रताप जयंती 9 मे रोजीच जन्मतारखेनुसार साजरी करण्यात यावी व या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करावी, समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय/निमशासकीय वसतीगृह स्थापन करण्यात यावे, भारत सरकारने विर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या नावाने स्वतंत्र सैनिकी विद्यालय सुरू करावे यासह अनेक मागण्या यावेळी करण्यात येणार आहे.या मागण्यांसाठी एकजूट महत्वाची असल्याने या महासमेलनास अमळनेर तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील सर्व राजपूत समाज बांधवांनी अवश्य उपस्थिती द्यावी असे आवाहन सकल राजपूत समाज महाराष्ट्र राज्य आणि अमळनेर तालुका राजपूत एकता मंच तर्फे करण्यात आले आहे.