अमळनेर:- कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने एकहाती विजय मिळवल्याने अमळनेर येथे तालुका काँग्रेस कडून जल्लोष करण्यात आला.
शहरातील रेस्ट हाऊस जवळील महाराणा प्रताप चौकात काँग्रेस नेत्यांनी घोषणा देत फटाके फोडून आनंद साजरा केला. यावेळी काँग्रेसचे डॉ. अनिल शिंदे, जयवंतराव पाटील, मनोज बोरसे, सुलोचना वाघ, डी डी पाटील, तुषार संदानशिव, तोसिफ शेख, शांताराम साळुंखे, प्रवीण जैन, गोकुळ बोरसे, यासह मोठ्या प्रमाणावर तालुक्यातून कार्यकर्ते उपस्थित होते.