अमळनेर:- तालुक्यातील मारवड पोलीस ठाण्यातील एपीआय जयेश खलाने यांची बदली झाल्याने एपीआय शितलकुमार नाईक हे रुजू झाले आहेत.
एपीआय जयेश खलाने यांची धुळे येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी रावेर येथून बदली होवून एपीआय शितलकुमार नाईक दिनांक १६ रोजी रुजू झाले आहेत. एपीआय नाईक हे मूळचे नंदुरबार येथील असून त्यांनी राज्यात बऱ्याच पोलीस ठाण्यात सेवा दिली आहे. रावेर येथे त्यांनी दंगलग्रस्त काळात मोठ्या प्रमाणावर जीव वाचविले होते. यावेळी एपीआय जयेश खलाने यांना निरोप देण्यात येवून नवीन एपीआय नाईक यांचे स्वागत करण्यात आले.