मो. राहीब शेख बिंगहॅम्टन युनिव्हर्सिटीत कॉम्प्युटर सायन्स विषयात मिळवले उत्तुंग यश…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील दोन विद्यार्थ्यांनी अमेरिकेत शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश मिळवले असून त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
मारवड येथील शेतकरी आणि कापड दुकान चालक रमेश मुंदडा यांचा नातु व व सध्या नाशिक येथे राहत असलेले किशोर मुंदडा यांचा सुपुत्र चि. वेदांत हा अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय येथील एमएस ही पदव्युत्तर उच्च शिक्षा परीक्षा विश्व विद्यालयातुन शंभर टक्के गुण मिळवित त्याच्या विभागातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. संपूर्ण विश्वासमोर आ वासून पसरलेली समस्या अन्नाची कमतरता सोडविण्यासाठी आणि तत्पर्याने शेतीवर पूर्णतः अवलंबून असलेल्या फूड सायन्स विथ मशीन लर्निग अँड डाटा सायन्स या किचकट विषयात त्याने हे नैपुण्य प्राप्त केले. त्यासाठी शेवटच्या टप्यात शोधपत्रासाठी त्याने अल्ट्रासाऊंड कॉन्टॅक्ट ड्राइंग ऑफ प्रोटीन्स हा क्लिष्ट विषय निवड़ुन त्यात पैकीच्या पैकी मार्क प्राप्त केले. खाद्य पदार्थांना अल्ट्रासाऊंड या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुकवुन त्याची टिकवुन ठेवन्याची क्षमता वाढ़विणे आणि नासाडी न होता जास्तीत जास्त बाजारात पोहोचते करता येऊ शकणे अश्या प्रकारचा त्याचा शोधक्रम होता. याआधी ही २०२० साली त्याने पदवी परिक्षेसाठी मुंबई येथील इन्स्टिट्युट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या प्रतिष्ठित महाविद्यालयातुन बी टेक ही परीक्षा रौप्य पदकासह उत्तीर्ण केली होती. या कार्यात त्याने आपल्या शेतकरी आजोबांकड़ून प्रेरणा घेऊन त्याच क्षेत्रात आपली कारकिर्द करावी हा मानस घेतला होता. यामुळेच अमेरिकेतील न्यूयॉर्क प्रांतातील जनरल मिल्स या सर्वात मोठया खाद्यपदार्थांवर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीत त्यांची निवड झाली आहे. त्याच्या या यशात वेदांतची आई वैशाली आणि वडिल किशोर मुंदडा यांचा खूप मोठा वाटा असून घरातील सर्व मोठ्यांचे संस्कार आणि आशीर्वाद हेच आपल्या यशाचे गमक आहे असे वेदांत याने सांगितले.
मारवड येथील एका दिवंगत प्राथमिक शिक्षकाचा नातु अमेरिकेत झाला पदवीधर…
मारवड येथील स्वर्गवासी अजित गुरुजी यांचा नातू व सध्या नवी मुंबई येथे राहत असलेले आसिफ़ शेख यांचा सुपुत्र मो. राहिब शेख़ हा अमेरिकेतील न्यूयॉर्क स्टेट मधील बिंगहॅम्टन यूनिवर्सिटी येथुन कॉम्प्युटर सायन्स विषयात पदव्युत्तर परिक्षेत ८२% मार्कांनी उत्तीर्ण झाला आहे. एका सामान्य प्राथमिक शिक्षकाच्या परिवारातुन आलेल्या या विद्यार्थ्याने थेट अमेरिकेतिल न्यूयॉर्कच्या स्टेट यूनिवर्सिटी पर्यंत मजल मारली असून राहिबने २०२० मधे बांद्रा, मुंबई येथिल रिझवी कॉलेजमधुन बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगची पदवी ९० टक्के प्राप्त करत उत्तीर्ण केली होती. अत्याधुनिक अशा आर्टिफिशियल इंटेलिजेन्स या प्रभागात त्याचा ख़ास हातखंडा आहे. त्याची आई डॉक्टर शहेला शेख़ ह्या होमिओपॅथी डॉक्टर असुन वडिल एक सिविल इंजिनियर आहेत. त्याचा यशामध्ये आई, वडिल, आजोबा आणि संपूर्ण परिवाराचा खूप मोठा सहभाग आहे. मारवड व पंचक्रोशीतुन राहिब आणि शेख़ परिवारावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.