अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे येथील विवाहितेने किचनमध्येच गळफास घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना काल १९ मे रोजी दुपारी घडली आहे.
कळमसरे येथील रहिवासी प्रमोद बापु निकम यांचा ग्राहक सेवा केंद्राचा व्यवसाय असून ते दुपारी घरी आले असता त्यांना दरवाजा लावलेला आढळल्याने त्यांनी त्यांची पत्नी रोहिणी हिला हाक मारली. मात्र तीने आवाज दिला नसल्याने मागील बाजूस जावून पाहिले असता ती छताच्या पंख्याला लटकलेली दिसली. त्यांनी शेजार्यांना आरोळी मारून बोलविले व तात्काळ खाली उतरवून अमळनेर येथे खाजगी दवाखान्यात आणले असता डॉक्टरांनी ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. तिथे घेऊन गेले असता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. रोहीणी प्रमोद निकम (वय २२) असे मयत विवाहितेचे नाव असून दुपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मयत रोहिणी निकम यांना दोन वर्षाचा मुलगा असून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय विनोद पाटील हे करीत आहेत.