अमळनेर:- येथील ॲड दिनेश पाटील यांची संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा कायदेशीर सल्लागारपदी निवड करण्यात आली असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कायदेशीर सल्लागारपदी नियुक्तीचे पत्र विभागीय अध्यक्ष शाम पाटील, जिल्हाध्यक्ष तुषार सावंत यांनी त्यांना दिले असून यावेळी जळगावचे आमदार राजूमामा भोळे, जिप सदस्य प्रताप पाटील, विभागीय अध्यक्ष शाम पाटील, जिल्हाध्यक्ष तुषार सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे मित्रपरिवार व तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे.