
शिरूड येथे शशिकांत पाटील यांचा निवडीबद्दल केला सत्कार…
अमळनेर:- तालुक्यातील शिरूड येथील शशीकांत पाटील यांची जिल्हा ग्रंथालय संघाच्या कार्याध्यक्षपदी कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे.

शिरूड येथील श्री दत्त सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष शशिकांत रघुनाथ पाटील यांची जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी स्तुत्य निवड झाल्याबद्दल शिरूड ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. नुकतीच जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत ग्रंथालय संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सतिश पाटील, उपाध्यक्ष रवींद्र पाटील, कार्यवाहक संजय पाटील यांनी शशिकांत पाटील यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड केली. यापूर्वी शशिकांत पाटील अमळनेर तालुका ग्रंथालय संघाच्या सदस्य पदी कार्यरत होते. त्यांनी तालुकास्तरावर केलेल्या कार्याची दखल घेत जिल्हा कार्याध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली. त्यांची ही निवड अमळनेर तालुका तसेच गावकऱ्यांसाठी अभिमानाची बाब आहे. त्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार शिरूड येथे आयोजित करण्यात आला होता. सत्काराला उत्तर देताना शशिकांत पाटलांनी सांगितले की माझ्यावर दिलेली जबाबदारी मी पूर्ण क्षमतेने पार पाडीन. वाचन संस्कृती रुजवण्यासाठी जे आवश्यक आहे ते सर्व प्रयत्न करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास शिक्षण संस्था मूडीचे संचालक जयवंतराव पाटील होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डी ए धनगर यांनी केले. यावेळी माजी मुख्याध्यापक एन टी पाटील, भालेराव पाटील, विजय पाटील, डी ए धनगर, वासुदेव पाटील, अनिल बाविस्कर, श्रीराम पाटील, शिवाजी पाटील, विश्वास बाविस्कर, अमरदीप पाटील, सुनील सोनवणे, साहेबराव सोनवणे, मनोहर सोनवणे, आनंदराव पाटील अनिल सोनवणे, दगडू सोनवणे, वसंत पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.








