
अमळनेर:- तालुक्यातील पाडसे येथे गावठी दारू विकणाऱ्या महिलेवर मारवड पोलिसांची कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाडसे येथे गावठी दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्याने मारवड पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला असता जिजाबाई बापू वडर ही महिला गावठी दारू विक्री करताना आढळून आली. तिच्याजवळ ३० लिटर गावठी दारू आढळून आल्याने नमुने घेवून उर्वरित दारूचा नाश करण्यात आला. पोना सुनील तेली यांच्या फिर्यादीवरून जिजाबाई विरुद्ध दारूबंदी अधिनियम ६५ ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ सचिन निकम हे करित आहेत.





