सेवानिवृत्त निवृत्तीचा कार्यक्रम हा सेकंड इनिंगची सुरुवात, आ. सत्यजित तांबेचे प्रतिपादन…
अमळनेर:- तालुक्यातील करणखेडा येथील विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालय येथे मुख्याध्यापक पी.ए. सोनवणे यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार व निरोप समारंभ संपन्न झाला.
दिनांक २६ रोजी विद्यालयाचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम आत्माराम सोनवणे हे नियत वयोमानाने सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार अनिल भाईदास पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सत्यजित तांबे हे उपस्थित होते. ह्या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, माध्यमिक पतपेढीचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील व तसेच शिक्षक संघटनेचे नेते आर एच बाविस्कर, माजी जिप सदस्य शांताराम पाटील अतिरिक्त न्याय दंडाधिकारी गुलाबराव हिलाल पाटील नाशिक, श्रीमती प्रभावती जयवंतराव पाटील, सरपंच कविता महेंद्र पाटील करणखेडा हे उपस्थित होते. यावेळी तांबे यांनी आपल्या भाषणात सेकंड ईनिंगचा उल्लेख करत मनुष्य सतत कामात राहिल्यास आयुष्य वाढते असे प्रतिपादन केले. तसेच यापुढे सेवानिवृत्त निवृत्तीचा कार्यक्रम हा सेकंड इनिंगची सुरुवात असा उल्लेख करावा असे म्हटले. पी ए सोनवणे सरांच्या उल्लेखनीय कामकाजाचा गौरव सर्व वक्त्यानी केला. संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव पाटीलांनी पी ए सोनवणे यांचा लहानपणापासूनचा स्नेहबंध उलगडून दाखवला.चांगल्या वागणुकीचे फळ हे चांगलेच मिळते असे प्रतिपादन केले. प्रास्ताविक पवार सरांनी केले मनोगत पी वाय पाटील सरांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती वसुंधरा लांडगे यांनी केले तसेच आभार ए. बी. धनगर सरांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी ग्रामविकास शिक्षण मंडळाचे सर्व संचालक मंडळ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते व सर्व कर्मचारी वृंदाने सहकार्य केले.