
त्यानंतरच सभापती अशोक पाटील झाले खुर्चीवर विराजमान…
अमळनेर:- खुर्चीचा कोणताही मोह न ठेवता भर उन्हात बाजार समिती येणार्या शेतकर्यांच्या नशिबी शुद्ध आणि थंड पाणी ही नसल्याने नवनियुक्त सभापती अशोक पाटील यांचे काळीज चर्र झाले आणि ही सुविधा देत नाही तोपर्यंत सभापतीच्या खुर्चीवर बसणार नाही, अशी प्रतिज्ञा घेतली होती. ती प्रतिज्ञा अखेर त्यांनी पूर्ण केली आणि त्यानंतरच ते मंगळवारी खुर्चीवर बसले. या सच्चा कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेत खुद्द आमदार अनिल पाटील यांनी त्यांना सभापतींच्या खुर्चीवर विराजमान केले आणि उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

अमळनेर बाजार समितीच्या सभापती पदाची निवड १६ मे रोजी झाली होती. अमळनेर बाजार समितीत आवक मोठ्या प्रमाणावर असून दोन्ही तिन्ही जिल्ह्यातून माल विक्रीला येतो. परंतु शेतकऱ्यांना पिण्यासाठी शुद्ध आणि थंड पाणी नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. शेतात राबराब राबून उन्हातान्हात आपला शेती माल घेऊन येताना आपल्या शेतकरी राजाला बाजार समिती शुद्ध आणि थंड पाणी ही नशिबी होऊ नये, ही बाब अशोक पाटील यांच्या लक्षात आली. खुर्चीचा मोह आधी ही नव्हता आणि मिळाल्यावरही तिचा मोह का असावा, वरिष्ठांनी विश्वास टाकल्यावर ती केव्हाही मिळेल, पण ज्यांच्या जीवावर आणि ज्यांच्यासाठी खुर्ची मिळाली आहे तो माझ्या बळीराजाला घोटभर थंड आणि शुद्ध पाणी मिळावे ही शुद्ध भावनेने अशोक पाटील यांना स्वस्थ बसू दिले नाही. आणि सभापती अशोक पाटील यांनी पहिल्याच दिवसापासून जोपर्यंत शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत सभापतीच्या खुर्चीवर बसणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली होती.
शेतकरी हिताचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सभापती अशोक पाटील झपाटल्यासारखे कामाला लागले आणि त्यांनी पंधरा दिवसात तातडीने शेतकऱ्यांसाठी शेतकरी निवास आणि कार्यालयाजवळ आरओचे थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली. आरओ यंत्रणेचे उदघाटन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रतिज्ञा पूर्ण झाली म्हणून आमदार पाटील यांनी सभापती अशोक पाटील यांना सभापतींच्या खुर्चीवर बसवले. आमदार अनिल पाटील यावेळी म्हणाले की, शेतकऱ्यांनी दिलेले मतदान सार्थ ठरवायचे असेल तर त्यांच्या सुखासाठी संचालकांनी अशाच पद्धतीने तळमळीने प्रयत्न केले पाहिजे. माझ्या पॅनलचे संचालक शेतकरी हिताचा विचार करत आहेत याचे मला समाधान आहे. यावेळी उपसभापती सुरेश पाटील, संचालक डॉ. अनिल शिंदे, प्रा. सुभाष पाटील, डॉ. अशोक पाटील, भोजमल पाटील, सचिन पाटील, नितीन पाटील, प्रकाश वाणी, वृषभ पारख, समाधान धनगर, शरद पाटील, विजय पाटील, सचिव डॉ. उन्मेष राठोड, अशोक वाघ, योगेश महाजन, दिगंबर पाटील, गणेश पाटील, निलेश पाटील, सुरेश शिरसाठ, योगेश इंगळे उपस्थित होते.








