
खानदेश शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला गौरव…
अमळनेर:- येथील खानदेश शिक्षण संचलित प्रताप महाविद्यालयातील बारावीतील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा काल दिनांक ३१ मे रोजी खानदेश शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे उपस्थित होते. यावेळी कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष माधुरी पाटील, कार्यकारी मंडळाचे सदस्य हरी भिका वाणी, नीरज अग्रवाल, योगेश मुंदडे, प्राचार्य डॉ ए बी जैन आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य उल्हास मोरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. दिनेश बोरसे आणि अमृत अग्रवाल यांनी केले तर आभार प्रा. भानुदास गुलाले यांनी व्यक्त केले. यावेळी सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.








