अमळनेर:- तालुक्यातील जैतपीर येथे तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या टपरीचालकावर मारवड पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दखल केला आहे.
सपोनि शितलकुमार नाईक यांच्या आदेशाने मारवड पोलिस ठाणे हद्दीतील पानदुकान चालकांवर तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रकरणी कारवाई करणे सुरू असून दिनांक १ जून रोजी जैतपीर येथे मराठी शाळेजवळील टपरीवर अजबसिंग शिंदे यांच्याकडे तंबाखू, बिडी, सिगारेट हे आढळून आल्याने तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक अधिनियम २००३ कायदा कलम ६,२४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. हेकॉ सचिन निकम, पोकॉ तुषार वाघ, पोकॉ उज्वल पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली असून पुढील तपास पो.हे.कॉ सचिन निकम करीत आहेत.