दोन दिवसात पोलिस करणार सखोल चौकशी…
अमळनेर:- येथील एका महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या केंद्रावरील लाचखोर बहिस्थ परीक्षकाला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी न्यायालयाने विद्यार्थी संबंधित प्रकरण असल्याने लाचखोराला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
या परीक्षकाने कोणकोणत्या पेपर करीता पैशांची मागणी केली आहे का ? एकूण किती विद्यार्थ्यांना मागणी केली ? किती विद्यार्थ्यांकडून पैसे स्वीकारले आदी बाबींचा तपास करण्यासाठी दोन दिवसांची पोलिस कोठडी मागण्यात आली. अमळनेर येथील एका महाविद्यालयाच्या केंद्रावर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू आहेत.यात विद्यापीठाने विजय गुलाबराव पाटील यांची बहिस्थ परीक्षक म्हणून नेमणूक केलेली होती. परीक्षा काळात परीक्षार्थींना विनाकारण त्रास देणे, कॉपी चालू देण्यासाठी त्यांच्याकडून पैशांची मागणी करीत त्रास देणे सुरू केले. यात तक्रारदार यांच्या पत्नीचे व इतर ८ विद्यार्थ्यांचे बॅचलर ऑफ लायब्ररी (बी.लिब) चे पेपर सुरू होते. विजय पाटील यांनी परीक्षक म्हणून पेपर सुरळीत चालू ठेवण्यासाठी तसेच कॉपीला सहकार्य करण्यासाठी प्रत्येक विषयासाठी १०० असे ९ विषयांसाठी एकूण ९०० रुपयांची अशी एकूण ७२०० रुपयांची मागणी त्यांनी विद्यार्थ्यांकडे केली. त्यानंतर २ जून रोजी पेपर सुरू झाल्यावर तक्रारदार विजय पाटील यांना तडजोड अंती ठरलेल्या रकमेपैकी ५००० रुपये महाविद्यालयाच्या आवारात देत असतांनाच नाशिक ला.प्र.वि. नाशिकचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर, पथकातील राजेंद्र गीते, संदीप बत्तीसे, संजय ठाकरे, संतोष गांगुर्डे यांनी पाटील यांना रंगेहाथ पकडून मुसक्या आवळल्या होत्या. याप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी पोलिसांनी त्याने यापूर्वी कोणकोणत्या पेपर करीत ता पैशांची मागणी केली आहे का.? एकूण किती विद्यार्थ्यांना मागणी केली, किती विद्यार्थ्यांकडून पैसे स्वीकारले आहे आदी बाबींच्या तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायाधिश पी. आर. चौधरी यांनी प्रकरणाचे गांभीर्य पाहून त्याला २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यामुळे पोलिसांना आता सखोल तपास करता येणार आहे.