
माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांचा सततचा पाठपुरावा…
अमळनेर:- शहरातील सावतावाडी भागात माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याने चेकर टाईल्स बसविण्याच्या कामाचा शुभारंभ काल करण्यात आला.

माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील यांच्या पाठपुरावा व मागणीनुसार नगर परिषद हद्दीतील जुना प्रभाग क्रमांक १५ मधील सावतावाडी भागातील अंतर्गत रस्ते वर चेकर टाईल्स बसविण्याच्या कामास मंजुरी मिळाली होती. या कामाचा शुभारंभ माजी उपनगराध्यक्ष डॉ रामदास शेलकर, विक्रांत भास्करराव पाटील व स्थानिक रहिवाशी लक्ष्मण चौधरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. माजी नगरसेवक प्रताप शिंपी यांचे सहकार्य या कामी लाभले. याप्रसंगी कैलास महाजन, प्रकाश महाजन सर, भूषण महाजन, प्रवीण ठाकूर, गौरव महाजन, ईश्वर चौधरी, सद्दाम शेख, सईद पठाण, दग्गु पठाण, जाकिर अली सैय्यद अली, नझिम शेख आदीसह नागरिक उपस्थित होते.







