उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शन…
अमळनेर:- तालुक्यातील तांदळी येथे खरीप पूर्व नियोजन सभा घेवून उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले.
तालुक्यातील तांदळी येथे कृषी विभागाच्या वतीने खरीप पूर्व नियोजन सभा घेण्यात आली. यावेळी कृषी सहाय्यक विद्या पाटील, कृषी पर्यवेक्षक योगेश वंजारी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बीज प्रक्रियेचे महत्त्व सांगण्यात आले. कृषी बियाण्यांची उगवण क्षमता तपासणे, व त्यातून पेरणी योग्य बियाणे निवडणे, तसेच बीबीएफ पेरणीचे महत्व सांगण्यात आले. कृषी फळबाग लागवड योजनेचे महत्त्व व योग्य संगोपन केल्यास शेतकऱ्यांना योग्य असा मोबदला मिळतो असे सांगत कृषी विभागाच्या इतर महत्त्वपूर्ण योजनांची माहिती कृषी सहायक विद्या पाटील यांनी दिली. यावेळी तांदळी येथील शेतकरी सुरेश नारायण पाटील, गणेश सुरेश परदेशी, कुणाल पाटील, एकनाथ खैरनार, स्वप्निल परदेशी, गुलाबराव पाटील, संजय पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.