
अमळनेर:- सेवानिवृत्तीवरील अनावश्यक खर्च टाळत अमळनेर तालुक्यातील इंद्रापिंप्री येथे नाला खोलीकरण करत लोकाभिमुख काम सुरू केल्याबद्दल भानुदास पाटील यांचा विविध मान्यवरांनी सत्कार केला.
इंद्रापिंप्री येथील पोलीस पाटील भानुदास पाटील यांनी डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या प्रेरणेने गावात लोकाभिमुख काम सुरू केल्याने जिल्हा ग्रंथालय संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष शशिकांत पाटील व धनगर समाज कर्मचारी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष डी ए धनगर यांनी भानुदास पाटील यांचा सत्कार केला. त्यांच्या समवेत धनराज गंगाराम पाटील या शेतकऱ्याने सुद्धा सत्कार्यासाठी मदत केल्यामुळे त्यांचाही सत्कार करण्यात आला.
सचिन पाटील मित्र परिवारातर्फे ही सत्कार…
भानुदास पाटील यांच्या या लोकाभिमुख उपक्रमामुळे गावातील पाणीटंचाई दूर होऊन शेती सिंचनाखाली येणार आहे. अनाठायी खर्चाला आळा घालत त्यांनी समाजापुढे नवा आदर्श घालून दिली असुन त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील व मित्र परिवारातर्फे त्यांचा प्रत्यक्ष नाला खोलीकरण होत असलेल्या ठिकाणी जात सत्कार करण्यात आला. तसेच या उपक्रमास सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे ही यावेळी कौतुक करण्यात आले.





