
अमळनेर:- येथील सुपुत्र तथा मुंबई येथील डी ए व्ही कॉलेजचे प्राचार्य प्रा. अजय भामरे याची मुंबई विद्यापीठाच्या उपकुलगुरू पदी नियुक्ती झाली आहे.
गेल्या एक वर्षांपासून मुंबई विद्यापीठात प्रभारी कुलगुरू म्हणून ते पदभार सांभाळत होते, आता उपकुलगुरु म्हणून नियमित नियुक्ती त्यांची झाली आहे. शैक्षणिक क्षेत्रात विशेष योगदान त्यांचे आहे.निवृत्त सहा.पोलीस उपायुक्त राजेंद्र भामरे यांचे ते बंधू असून मुंबई विद्यापीठाच्या उपकुलगुरू पदी विराजमान होण्याचा मोठा बहुमान त्यांनी प्राप्त केल्या बद्दल त्यांचे अमळनेर मित्र परिवारातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.








