
अमळनेर:- तालुक्यातील अमळगाव येथील अल्पवयीन तरुणीला अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेले असून मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळगाव येथील १५ वर्ष ११ महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी दिनांक १२ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दुकानात जावून येते असे सांगून घरातून निघाली. मात्र बराच वेळ झाला तरी ती परत न आल्याने तिचा शोध घेतला असता मिळून आली नाही. नातेवाईकांकडे व जवळच्या परिसरात शोध घेतला असता मिळून आली नाही. त्यामुळे अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याची खात्री झाल्याने मुलीचे वडिलांनी पोलीसात फिर्याद दिली आहे. पुढील तपास हे. कॉ. संजय पाटील हे करीत आहेत.







