
अमळनेर:- तालुक्यातील मूडी प्र. डांगरी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना मांडळ येथील बँक ऑफ बडोदातर्फे लंचबॉक्सचे वाटप करण्यात आले.
बँक ऑफ बडोदाच्या ११६व्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत असून मांडळ शाखेतर्फे मूडी प्र. डांगरी, बोडर्दे जिल्हा परीषद प्राथ. शाळेत १०० विद्यार्थ्यांना लंचबॉक्सचे वाटप करण्यात आले. शाखाधिकारी राकेश बाविस्कर व मुख्याध्यापक गोकुळ साळुंखे यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. यावेळी जितेंद्र पाटील, राजेश सोनकोचुरे, देवेंद्र सानप, तुषार पाटील, विनोद चौधरी हे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आर के पाटील, श्रीमती पिंगळे, श्रीमती कदम, श्रीमती कविता पाटील, श्रीमती लांडगे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश शिंपी यांनी केले




