तालुकाध्यक्षपदी जयंतलाल वानखेडे तर कार्याध्यक्षपदी समाधान मैराळे…
अमळनेर:- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या दि.1 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत सर्वानुमते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अमळनेर तालुका अध्यक्ष पदी ज्येष्ठ पत्रकार जयंतलाल वानखेडे यांची तर कार्याध्यक्षपदी समाधान मैराळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
अमळनेर शहरातील पवित्र धार्मिक स्थान असलेल्या मंगळ ग्रह मंदिर परिसरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार संघाची बैठक उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार डिगंबर महाले सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे, खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, खान्देश विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, जिल्हाध्यक्ष शरद कुळकर्णी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नागराज पाटील, एरंडोल तालुका अध्यक्ष संजय चौधरी,गजानन गिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अमळनेर तालुकाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार जयंतलाल वानखेडे यांची निवड करण्यात आली.सदर निवड घोषित करुन नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष यांचा सत्कार करुन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व वरिष्ठ पदाधिकारी आणि नवनियुक्त तालुका अध्यक्ष जयंतलाल वानखेडे यांनी कार्याध्यक्ष म्हणून पत्रकार समाधान मैराळे यांची निवड केली. सर्वानुमते निवड घोषित करुन नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा उपस्थितांनी सत्कार करुन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी नवीन तालुका कार्यकारणी गठित करणे, सभासद नोंदणी मोहीम चालवून नवीन सभासद करने, सभासदाच्या पाल्यांचा विद्यार्थी गुणगौरव सोहळाचे आयोजन करणे,सभासदांच्या परिवाराची वैद्यकीय चाचणी शिबिराचे आयोजन करणे,सभासदांच्या मुलांच्या शिक्षणाला गरजे नुसार मदतीचा हात पुढे करण्यावर विचार विनिमय करने, आदी बाबतीत बैठकीत चर्चा करण्यात आली.सर्व स्तरातून नूतन तालुका अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांचे अभिनंदन होत आहे.बैठकीचे प्रास्ताविक माजी तालुका उपाध्यक्ष प्रा विजय गाढे यांनी केले. नूतन तालुका अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांना पुढील वाटचालीसाठी प्रा विजय गाढे, धनंजय सोनार, ईश्वर महाजन, उमेश धनराळे, गौतम बिऱ्हाडे , जयेश काटे, उमेश काटे, हिरालाल पाटील,विनोद कदम, रवींद्र मोरे,सुरेश कांबळे,भरत पवार, अजय भामरे,नूरखान पठाण ,राहुल पाटील, जितेंद्र पाटील, प्रवीण बैसाणे, आत्माराम अहिरे, काशिनाथ चौधरी, दिनेश पालवे, हितेंद्र बडगुजर यांनी अभिनंदनाचा वर्षाव करत शुभेच्छा दिल्या.