अमळनेर:- तालुक्यातील पिंपळी व दहिवद येथे दि. ३ ऑगस्ट रोजी धुळे येथील कृषी महाविद्यालयातील कृषीदूत यांनी ग्रामीण कृषी कार्य अनुभव कार्यक्रमच्या द्वारे कृषीचे आधुनिक काळातील तंत्रज्ञान बद्दल माहिती दिली.
पिंपळी येथे शेतकर्यांना रोग नियंत्रण कसे करावे, या विषयी सल्ला दिला. तसेच दुधापासून विविध पदार्थ कसे बनवावे, मोबाईल ॲपचा वापर कसा करावा, तन नियंत्रणासाठी पद्धती, पिकासाठी खतांचा योग्य वापर कसा करावा, यांचे मार्गदर्शन केले. यावेळी पिंपळी सरपंच प्रेमराज चव्हाण, ग्रामसेवक विवेक सुर्यवंशी , कृषीदुत कैलाश पवार, सुरज कांबळे, सोनय कुमार, अथर्व कुलकर्णी, नविन कुमार, सागर महाले, चैतन्य ढवळे व ग्रामस्थ उपस्थित होते. कृषीदूत यांना प्राचार्य डॉ. सी. डी. देवकर, डॉ. जी. बी. काबरे, डॉ. के. के. बराटे, डॉ. संदीप पाटील, डॉ. विकास पवार यांनी मार्गदर्शन केले.
दहिवद येथे ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव योजना कार्यक्रमांतर्गत कृषीदूत नागेश्वर क्षिरसागर,मनोज केंचे, प्रसाद गायकवाड,सुशांत खामकर, हर्षवर्धन गायकवाड,अक्षय गावडे यांचे सरपंच देवानंद बहारे , ग्रामविकास अधिकारी शेखर धनगर व इतर ग्रामस्थांनी स्वागत केले . या कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सी.डी. देवकर सर , डॉ. पी. डी सोनवणे सर, डॉ. जी. बी काबरे सर, डॉ. आर. जे. देसले, डॉ. विक्रांत भालेराव, डॉ.व्ही. एस गिरासे सर,डॉ. संदीप पाटील, डॉ. संदीप पौळ , डॉ. विकास पवार, डॉ.प्रशांत पवार, डॉ.सुनील पाटील, डॉ.संदीप निकम, डॉ.पंकज देवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवद गावातील शेतकऱ्यांशी एकात्मिक कीड व्यवस्थापन,एकात्मिक तन व्यवस्थापन, एकात्मिक रोग व्यवस्थापन, शेतीपूरक व्यवसाय , उत्पन्न वाढीसाठी नवीन विकसित वाणांचा वापर, जैविक खतांचा वापर, मृदा व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि आधुनिक यंत्राचा वापर इत्यादी विषयांवर चर्चा केली.