
मेरी मिट्टी मेरा देश अभियांनातर्गत नगरपरिषदेतर्फे उपक्रम…
अमळनेर:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सांगता निमित्त शहरात १०५ फूट तिरंगा चौकात शिलाफलक उभारण्यात येणार आहे.
मेरी मिट्टी मेरा देश अभियांनातर्गत देशातील स्वातंत्र्य सैनिक, हुतात्म्यांना, देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांसाठी शिला फलक उभारण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे अमळनेर शहरातील पाच कंदील चौकातील कामगारांसाठी लढा देणाऱ्या लाल बावटा नेत्यांचे, बलिदानाचे स्मारकाचे नूतनीकरण पालिकेने सुरू केले आहे. त्याच प्रमाणे पैलाड येथील पोलीस चौकी जवळील बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक देखील नव्याने उभारण्यात येणार आहे. तर आगामी साहित्य संमेलनाचे निमित्त साधून सुभाष चौकातील सुभाष बाबूजींचा पुतळा आणि सानेगुरुजींच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी सांगितले. गेल्या वर्षीप्रमाणे घरोघरी तिरंगा फडकवण्यात येऊन रोप वाटिका तयार करण्यात येईल. सामूहिक राष्ट्रगीत म्हणण्यात येणार आहे.




