अमळनेर:- शहरातील मुंबई गल्ली भागात राहणारा ६९ वर्षीय वृद्ध इसम बेपत्ता झाला असून कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याबाबत अमळनेर पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.
शहरातील मुंबई गल्ली भागात राहणारे अरुण गोविंदलाल शाह (वय ६९) यांचे मानसिक संतुलन ढासळलेले असून दिनांक ११ रोजी ते राहत्या घरातून कोणास काही न सांगता निघून गेले आहेत. आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला मात्र ते मिळून न आल्याने भावाच्या तक्रारीवरून अमळनेर पोलिसांत हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एएसआय रामकृष्ण कुमावत हे करीत आहेत.