११ जागांसाठी २२ उमेदवार आहेत रिंगणात, २६ रोजी होणार मतदान…
अमळनेर:- तालुक्यातील मुडी येथील ग्रामविकास शिक्षण संस्थेच्या १५ जागांपैकी ४ जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ११ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात आहेत. दिनांक २६ रोजी मतदान होणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष व सेक्रेटरी थेट सदस्यांमधून निवडले जातात. अध्यक्षपदासाठी माजी चेअरमन उदय नारायण पाटील, प्रवीण विनायकराव पाटील, ऑ. सेक्रेटरी पदासाठी मीनल सुनील पाटील व भरत जीवन पाटील रिंगणात आहेत. मुख्याध्यापक प्रतिनिधी मधून दोन सदस्य निवडले जातात. राजेंद्र आत्माराम शिंदे, दीपक चंदन पाटील हे दोन्ही बिनविरोध निवडून आले आहेत. तर लोण गावातून शिवाजी नथ्थू पाटील, मुडी गावातुन सुनील राजधर पाटील हे दोन सदस्य देखील निवडून आले आहेत. तर सारबेटे गावातून कमलाकर विनेश पाटील, राजेश निंबाजी पाटील, कोळपिंप्री गावातून प्रवीण अमृतराव काटे व उमेश प्रतापराव काटे, अंबापिंप्री गावातून गोविंद नगराज पाटील, अशोक हिम्मतराव पाटील, गांधली पिळोदा गावातून अनिल नथ्थू शिंदे, गजेंद्र दत्तात्रय साळुंखे, शिरूड गावातून पुष्पलता अशोक पाटील, कन्हैयालाल पुंजु पाटील, विनायक तापिराम पाटील, शिक्षक प्रतिनिधी म्हणून सयाजीराव अंबु पाटील, प्रमोद मधुकर सोनवणे, हर्षल सतीश सोनवणे, माधुरी रमेश पाटील, जगदीश देविदास अहिरे तर शिक्षकेतर प्रतिनिधी म्हणून संगीता राजेंद्र पाटील, सुभाष आत्माराम पाटील हे रिंगणात आहेत. दिनांक २६ रोजी मतदान होणार असून निवडणूक अधिकारी म्हणून ना जे लांजेवार काम पाहणार आहेत.