मंगरूळ जवळील घटना, चालक फरार, पोलिसांत गुन्हा दाखल…
अमळनेर:- घोडगाव ता चोपडा येथील मावस भाऊचा मुलगा वणी गडावर पायी जात असताना तब्येत बिघडली म्हणून त्यास डांगर येथून घेऊन वापस परत घरी येत असताना मंगरूळ अमळनेर दरम्यान अमळनेर कडून भरधाव वेगाने येणाऱ्या 407 ने उडविले त्यात पाडळसरे येथील मोटरसायकल चालक काका गोरख बिभीषण कोळी वय ३५ हे जागीच ठार झाले तर कृष्णा भगवान भिल वय ३८, सौरभ दीपक कोळी हे वय ११ राहणार घोडगाव ता चोपडा तर वणी गडावर पायी जाणारा विक्की राजेंद्र पारधी वय २० राहणार चोपडा हे तीन जण गंभीर जखमी झाले असून हा अपघात दिनांक ३० रोजी रात्री ११ वाजता मंगरूळ एमआयडीसी जवळ ऋषिकेश इंडस्ट्रीज जवळ झाला. अपघातग्रस्त ठिकाणी अमळनेर पोलिसांनी मालवाहतूक ४०७ ताब्यात घेतले असून चालक फरार झाला आहे , याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत विविध सात कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
वणी देवीच्या दर्शनासाठी पायी वारीत चालत घोडगाव ता चोपडा येथील सौरभ हा जात असताना त्याची जानवे डांगर जवळ तब्येत बिघडली म्हणून त्याचे वडिलांनी पाडळसरे येथील मावस भाऊ गोरख कोळीला कळविले. गोरख कोळी , कृष्णा भिल हे एमएच १९- सीई-५५६० या मोटरसायकलने सौरभ यास घ्यावयास गेले ,येथून त्यास घेऊन परत घरी येत असताना मंगरूळ गावाच्या पुढे अमळनेर कडून भरधाव वेगाने चुकीच्या पद्धतीने येणाऱ्या मालवाहू एमएच १८-एए,७५६५ या ४०७ ने मोटरसायकलला उडवून दिल्याने गोरख कोळी हा जागीच ठार झाला तर कृष्णा भिल व सौरभ कोळी लांब फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. पुढे जाऊन विक्की पारधी यास ही धडक मारून ४०७ ने जखमी केले. वणी जाणाऱ्या भाविकांनी वाहन थांबवून जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता गोरख कोळी यास डॉक्टरांनी मृत घोषित केले. उर्वरित जखमींवर प्रथमोपचार करून धुळे येथे हलविले आहे , गोरख कोळीवर आज दिनांक ३१ रोजी शवविच्छेदन होऊन गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचे पश्चात्य विधवा आई, पत्नी, तीन मुली व मुलगा असा परिवार आहे. याबाबत कृष्णा भिल याच्या फिर्यादिवरुन अमळनेर पोलीस ठाण्यात ४०७ चालकाविरुद्ध विविध सात कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून तपास पीएसआय शिंदे करीत आहेत.