
अमळनेर:- येथील धुळे रस्त्यावरील शेतकी संघाच्या जीनमध्ये शासकीय शासकीय भरड धान्य खरेदी नोंदणी नाव सुरू झाली असून मका, ज्वारी, बाजरी धान्य खरेदी करण्यात येणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन शेतकी संघातर्फे करण्यात आले आहे.

शेतमाल नोंदणीसाठी अगोदर शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार असून १ नोव्हेंबर पासून नोंदणी सुरू करावी असे पत्र पणन महासंघाने शेतकी संघाला दिले आहे. शेतमाल विकताना विविध ठिकाणी होणारी शेतकऱ्याची अडवणूक, पिळवणूक रोखण्यासाठी शासनाचे भरड धान्य खरेदी केंद्र हा पर्याय दिला आहे. शेतकऱ्यांनी धान्य विक्रीसाठी शासकीय भरड धान्य केंद्रावरच आणावे यासाठी नाव नोंदणी यावेळी सुरू करण्यात आली आहे. यासाठी शेतकी संघ नाव नोंदणी करत आहे. यासाठी व्यवस्थापक व कर्मचारी हजर आहेत. विक्रीपूर्वी शेतकर्यांनी ऑनलाईन नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी शासनाच्या निकषाप्रमाणे मका, ज्वारी, बाजरी हा शेतमाल १४ टक्क्याच्या आतील आर्द्रता असलेला शेतमाल विक्रीस आणावा. जसा खरेदीचा एसएमएस येईल त्याची माहिती शेतकऱ्यांना अगोदर कळविली जाईल. भरड धान्य विक्रीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. सध्याचा चालू हंगामाचा पिकपेरा लावलेला सातबारा उतारा, पीक पेरा, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, सध्या सुरू असलेले बँक खाते पासबूक घेऊन येऊन शेतकी संघात शेतकऱ्याची नोंदणी शेतकी संघ व्यवस्थापक संजय पाटील यांच्याकडे केली जाणार आहे. जसा क्रमांक लागेल तसा माल विक्रीस आणला जाईल.

