५ सप्टेंबर रोजी हॅपीनेस प्रोग्रामचे केले आयोजन…
अमळनेर:- श्रावण महिन्यात भगवान शंकराची विवीध स्वरूपात भक्ती व पुजा अर्चा केली जाते. त्यानिमित्ताने अमळनेर येथील स्वामी नारायण मंदिरात आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे रुद्र पुजेचे आयोजन करण्यात आले होते.
रूद्र पुजेत भगवान शंकराच्या रुद्र अवताराचे पुजन केले जाते. तसेच जीवनात कितीही विरोधाभास असला तरी यशस्वीपणे जिवन जगायचे असते असे आपणास रूद्र पुजेत शिकण्यास मिळते अशी माहिती आर्ट ऑफ लिव्हिंग चे स्वामी कल्याणकरजी यांनी पुजाआरंभी दिली. रुद्र पुजेस डाॅ अनिल शिंदे , दिपाली शिंदे व डाॅ मयूरी जोशी हे मुख्य यजमान म्हणून उपस्थित होते. पुजेस अमळनेर व ग्रामीण भागातून 23 जोडपे सहभागी झाले. रुद्र पुजेत दिपक राव, वृंदा राव, सचिन भैय्या, योगेश चौक व विवेक शहा यांनी संगीतमय साथ दिली. तर पं. अंकुर पांडे व पं. विकास तिवारी यांनी षोडशोपचार मंत्रोच्चारणासह पुजा पार पाडली. रूद्र पुजा यशस्वी होण्याकरिता आयोजक आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक पोपट भराटे, बी एन पाटील, डाॅ माहेश्वरी, प्रविण सोनवणे, युवाचार्य पवन वाघ, साधक अशोक चौधरी व गिरीष पाटील आदींनी पुजा संपन्न होण्याकरिता प्रयत्न केले. तसेच दि. 5 सप्टेंबर रोजी अमळनेर येथे हॅपीनेस प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांमार्फत देण्यात आली.