
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळेत समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत गणवेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा समितीचे अध्यक्ष अरुण कुमार साळुंखे, उपाध्यक्ष हेमकांत साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य बी .डी. पाटील तसेच अशोकजी सोनवणे केंद्रप्रमुख मारवड, मुख्याध्यापिका श्रीमती मनीषा निकम यांच्या उपस्थितीत उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक दिनेश मोरे यांनी केले. मान्यवरांचे आभार उपशिक्षक शारदा जाधव यांनी मानले.