
अमळनेर:- शहरातील ताडेपुरा भीमनगर भागातील रहिवासी आणि सीआयएसएफचा जवान नितिन रामसिंग बहारे यांनी सीआयएसएफ फोर्सकडुन हरियाणा, पाणीपत येथे घेण्यात आलेल्या ज्यूडो कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
बारा वर्षांपूर्वी नितीन बहारे हा ज्यूडो खेळाडू म्हणून सीआयएसएफ मध्ये भरती झाला असून त्याच्या या सुवर्ण कामगिरी मुळे सीआयएसएफच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. नितीन बहारे हे सामाजिक कार्यकर्ता किरण बहारे यांचा लहान भाऊ असून नितीनच्या यशामुळे बहारे परिवाराचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.




