२८० वारकरी झाले सहभागी, ठिकठिकाणी वारीचे झाले स्वागत…
अमळनेर:- अमळनेर ते श्री क्षेत्र कपिलेश्वर पायीवारीचे श्री साई गजानन मंडळाकडून ४ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते.
४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेपाच वाजता मोठे बाबा मंदिरावर शिवाजीराव मोहन पाटील यांच्या हस्ते आरती होऊन सामूहिक महापूजा करण्यात आली. गण गण गणात बोते मंत्र जप करत वारीचे प्रस्थान करण्यात आले. मोठेबाबा मंदिर आवारात प्रा आर व्ही पाटील यांच्या वतीने वारकऱ्यांना सकाळचा दूध चहा देण्यात आला. टाळ मृदंगाच्या गजरात सकाळी वारीचे प्रस्थान झाले वारीत सुमारे 280 वारकरी सामील झाले होते. ओम नमः शिवाय मंत्र जपत, वारकऱ्यांना श्रीराम मंदिराजवळ जितेंद्र रमेश बोरसे यांनी भाविकांसाठी राजगिरा लाडूचे वाटप केले. वारीचे प्रमुख श्री शिवाजीराव मोहन पाटील व मंडळांचे विठ्ठल पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार शिस्तबद्ध पद्धतीने वारी धार या गावी पोहोचली. त्या ठिकाणी शशिकांत पाटील, सैदाणे सर यांनी वारकऱ्यांसाठी उपासाची खिचडी व केळी प्रसाद वाटप केले. वारीप्रमुख शिवाजी मोहन पाटील तसेच विठ्ठल पाटील, शिरीष डहाळे यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार धार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. पायीवारीत सडावन , चाकवे, धार येथील भाविक सामील झाले होते. पालखीचे गावात मिरवणूक काढून घरोघरी आरत्या करण्यात आल्या. एस एम आप्पांनी व डहाळे सरांनी यांनी मुस्लिम बांधवांचा देखील त्या ठिकाणी सन्मान केला व जातीय सलोखा वाढवण्यासाठी शुभेच्छा दिल्यात. पुढे वारीला धानोरा फाट्यावर नितीन नीलकंठ पाटील व दीपक पाटील यांनी खजूर प्रसाद वाटप केला. मारवड येथे भैरवनाथ मंदिरावर वारकरी विसावले. या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी मुकेश साळुंखे व सुनील मुंदडे यांनी वारकऱ्यांसाठी साबुदाणा खिचडी फराळाची व्यवस्था केलेली होती. त्या ठिकाणी देखील वारी प्रमुखांसह मंडळाचे पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. निंबा पाटील, सुनील मुंदडे व मुकेश साळुंखे यांचा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. मोतीलाल कुंभार यांनी चहाची व्यवस्था केली होती. वारकऱ्यांनी चहा घेऊन, कळमसरे वेशीजवळ किशोर चौधरी यांनी चिक्की पाकीटचे वाटप वारकऱ्यांना केले. कळमसरे गावाजवळ अनेक महिला भगिनींनी पूजेसाठी पुढे येऊन पूजा केली. पुढे ओम नमः शिवायचा जयघोष करत पालखी शिवमंदिराच्या प्रारंगात दाखल झाली. त्याठिकाणी पिंटू राजपूत यांनी वारकऱ्यांसाठी केळी प्रसाद व उपास चिवडा, फराळ दिला. भिकेसिंग राजपूत, प्रदीपसिंग राजपुत, दरबारशिंग राजपूत यांचा व सेवा देणारे भाविक यांचा मंडळाचे सदस्य व वारी प्रमुखांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. निम येथे छोटु पाटील यांनी सरबत सेवा दिली. वारीत सुमारे २८० महिला भगिनी-पुरुष दाखल झाल्या होत्या. वारी कपिलेश्वर तीर्थाच्या जवळ पोहोचल्यानंतर सी एस पाटील व मगन भाऊसाहेब हे वारीस मानवंदना देण्यासाठी पुढे आले. वारी प्रमुख एस एम आप्पा, विठ्ठल पाटील, डहाळे सर यांना पुढे करत वारी श्री क्षेत्र कपिलेश्वर येथे पोहोचले. तेथे भजन सेवा सत्संग करण्यात आला. त्या ठिकाणी कपिलेश्वर संस्थांच्या वतीने शिवाजीराव मोहनराव पाटील यांना वारीप्रमुख म्हणून मानाचे नारळ देऊन सत्कार केला. त्यासोबत शाल श्रीफळ देवून महामंडलेश्वर हंसानंदाजी तीर्थराज महाराज व ट्रस्टचे सी एस पाटील, मगन भाऊसाहेब यांच्या हस्ते त्यांना सन्मानित केले. महाराजांच्या हस्ते मंडळाच्या प्रमुख कार्यकर्ते यांना ही श्री फळ देण्यात येऊन त्यांना महाराजांनी आशिर्वाद दिले. पायीवारी वारकऱ्यांना कपिलेश्वर संस्थेकडून महाप्रसाद सेवा दिली वारीत धार, मारवड, कळमसरे, सडावन, नेरपाट, चाकवे येथील महिलांना ग्रुपनुसार सन्मानित करण्यात आले. पायवारीसाठी जे पुरुष वारकरी आले होते त्यांना देखील सन्मानित करण्यात आले. धुडकू महाराज यांनी पाणी जार सेवा उपलब्ध केली. सडावण येथील नामदेव बापू, गुलाब मुरलीधर पाटील, चाकवे येथील सुखदेव पाटील ,पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष अंकुश पाटील, समाधान पाटील, शनि महाराज, तुळशीराम व्यंकट पाटील ईश्वर पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. श्री साई गजानन मंडळाचे विठ्ठल पाटील, रमेश सैंदाणे, लक्ष्मण निकम, गुणवंत पवार, डहाळे सर, रमेश पाटील, दिलीप खैरनार, योगेश बाग, आर एच पाटील, वाल्मिक मराठे, अशोक इसे, राजेंद्र सोनवणे,सुरेश धनगर, कांतीलाल पाटील, मुकेश साळुंखे, चेतन पाटील, गणेश बोडरे, सुभाष साळुंखे, डी ई पाटील, योगेश पाटील यांनी परिश्रम घेतले. मंडळाचे अध्यक्ष एस एम पाटील व सचिव विठ्ठल पाटील,शिरीष डहाळे यांनी सर्वांचे आभार मानले.