
तडजोडपात्र प्रकरणात इच्छुकांनी प्रकरणे मिटवण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन…
अमळनेर:- तालुका विधी सेवा समितीच्या वतीने ९ रोजी अमळनेर न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असून न्यायालयातील प्रलंबित तडजोडपात्र प्रकरणात इच्छुकांनी प्रकरणे मिटवण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस बी गायधनी यांनी केले आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली आणि महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार ९ रोजी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. दुरचित्र संवाद प्रणालीच्या माध्यमातून प्रकरणे तडजोड करून मिटवण्याची मुभा देण्यात आली आहे. या लोकअदालतीत धनादेश अनादर प्रकरणे, बँक कर्ज वसुली, विद्युत आणि पाणी देयकाची प्रकरणे, तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, वैवाहिक वाद संपादन प्रकरणे, कौटुंबिक वाद, भूसंपादन प्रकरणे, दिवाणी दावे ठेवली जाणार आहेत. पक्षकारांनी आपापली प्रकरणे मिटवण्यासाठी अर्ज करावेत. लोक अदालतीत न्यायनिवाडा झालेल्या प्रकरणात कोणत्याही न्यायालयात आवाहन देता येत नाही, सामंजस्याने आपसी वाद मिटल्यास वेळ आणि पैसे वाचतात,प्रलंबित प्रकरणे कमी होतात आणि पक्षकारांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळते त्यामुळे पक्षकारांनी राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस बी गायधनी यांनी केले आहे.




