![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2023/09/20_10_2022-court_hammer_23152637-1.jpg?fit=1024%2C576&ssl=1)
अमळनेर कोर्टाने ठोठावला एकाला आठ महिने कारावास…
अमळनेर :- तिकीट काढून घे असे बोलण्याचा राग आल्याने एकाने वाहक व बस चालक यांना शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या एकाला अमळनेर न्यायालयाने आठ महिन्याचा कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2023/09/IMG-20230904-WA0060-28.jpg?resize=640%2C427&ssl=1)
याबाबत अधिक माहिती अशी की, महिला वाहक ह्या दि.४ जानेवारी २०२२ रोजी चोपडा अडावद ह्या बसमध्ये कर्तव्यावर असतांना आरोपी रतीक झुलाल पाटील (वय २९ रा.कमळगाव ता.चोपडा) हा सीट वर बसून मोठ्या आवाजात गाणे ऐकत होता. वाहकाने त्यास तिकिटाबाबत विचारणा केली असता.त्याने प्रतिसाद दिला नाही, परत तिकिटाबाबत विचारणा केल्याने त्यास त्याचा राग आला आणि कमळगाव आल्यावर त्याने वाहकास जोरदार धक्का दिल्याने वाहक बस मधून खाली पाडून शिवीगाळ करू लागला व कानाखाली मारली. याबाबत चालक यांनी विचारले असता त्याने चालकाला देखील मारहाण करण्यास सुरुवात केली. याबाबत चोपडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खटल्यात आठ साक्षीदार तपासण्यात आले.त्यात फिर्यादी, बस चालक, प्रत्यक्षदर्शी, सरकारी पंच, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील यांची साक्ष महत्वाची ठरवत जिल्हा न्यायाधिश वर्ग १ पी आर चौधरी यांनी आरोपीस भादवी कलम ३३२ नुसार आठ महिने शिक्षा तसेच कलम ३५३ मध्ये आठ महिने शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील किशोर बागुल यांनी युक्तिवाद केला.तर पैरवी अधिकारी सहायक फौजदार उदयसिंह साळुंखे,पोलीस हेड कॉन्स्टेबल हिरालाल पाटील,पोलीस कॉन्स्टेबल नितीन कापडणे,अतुल पाटील,राहुल रणधीर यांनी काम पाहिले.