
सर्वाधिक खटले निकाली निघाल्याने ठरली आतापर्यंतची मोठी लोक अदालत…
अमळनेर:- येथील जिल्हा न्यायालयात दिनांक 9 रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत १०८६ प्रलंबित खटल्या पैकी ९६ खटले निकाली निघाले. यात तब्बल २,९९,२४,८६२ रुपये एवढी वसुली झाली तर ३६२८ वादपूर्व खटल्यापैकी ४३० खटले निकाली निघून यात वसुली २९,५६,४१० रुपये झाली.

पॅनल क्र १ मध्ये पॅनल प्रमुख पी आर चौधरी (जिल्हा न्यायाधीश २, अमळनेर) पॅनल पंच म्हणून ॲड आर व्ही निकम वकील तर पॅनल क्र २ मध्ये पॅनल प्रमुख म्हणून पी पी देशपांडे (दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, अमळनेर) पॅनल पंच म्हणून ॲड एस एन पाटील वकील, पॅनल क्र ३ मध्ये पॅनल प्रमुख म्हणून न्या एन आर येलमाने (सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, अमळनेर) पॅनल पंच म्हणून एन व्ही सूर्यवंशी वकील,पॅनल क्र ४ मध्ये पॅनल प्रमुख म्हणून श्रीमती एस एस जोंधळे (२ रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, अमळनेर) पॅनल पंच म्हणून अँड श्रीमती ए बी महाजन वकील होते. सदर लोक अदालत मध्ये सरकारी वकील ॲड के आर बागुल, ॲड आर बी चौधरी, वकील संघाचे वरिष्ठ विधीज्ञ ॲड व्ही डब्लु वाणी, वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य, तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान या राष्ट्रीय लोक अदालतीत सर्वाधिक खटले निकाली निघाल्याने आतापर्यंत सर्वात मोठी लोक अदालत ही ठरली आहे.