
अमळनेर:- तालुक्यातील निम येथे तापी नदीतून पुरुष जातीचे प्रेत वाहून आले असून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील निम येथे रवींद्र पांडुरंग चौधरी यांच्या शेताजवळ तापी नदीकाठी अज्ञात इसमाचे प्रेत वाहून आल्याचे शेतकऱ्याला दिसून आले. त्यांनी पोलिस पाटील निताली पाटील यांना कळविले असता त्यांनी मारवड पोलीसात याची खबर दिली असून पो ना सुनील तेली व डॉ. जी एम पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असता पुरुष जातीचे ४५ ते ५० वय असल्याचे त्यांनी कळविले. प्रेत कुजलेल्या अवस्थेत असल्याने डॉ. जी एम पाटील यांनी त्याजागीच शवविच्छेदन करत पोलिसांनी प्रेतावर अंत्यसंस्कार केले. मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो ना सुनील तेली करीत आहेत.

