मुलाच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत हरविल्याची नोंद…
अमळनेर:- तालुक्यातील निंभोरा येथे प्रेतयात्रेसाठी आलेला ५२ वर्षीय इसम परत सुरत जाण्यासाठी निघाल्यानंतर बेपत्ता झाला असून मारवड पोलिसांत बेपत्ता झाल्याची फिर्याद त्यांच्या मुलाने दिली आहे.
तालुक्यातील मुळचे धुपी येथील रहिवासी व सध्या कामानिमित्त सुरत येथे राहणारे गोकुळ बळीराम पाटील (वय ५२) हे आपल्या शालकाच्या प्रेतयात्रेसाठी दिनांक ८ रोजी निंभोरा येथे आले होते. दिनांक १० रोजी परत सुरत जाण्यासाठी ते निंभोरा येथून निघाले. मात्र आजपावेतो ते सुरत येथे राहत्या घरी पोहचले नसल्याने त्यांचा मुलगा पवन पाटील याने मारवड पोलिसांत हरविल्याची तक्रार नोंदवली आहे. पुढील तपास हे कॉ संजय पाटील हे करीत आहेत.