महिला तालुकाध्यक्षपदी सविता अहिरे यांची बिनविरोध निवड…
अमळनेर:- तालुका जुनी पेंशन हक्क संघटनेची निवड प्रक्रिया पार पडली असून तालुकाध्यक्ष पदी उमाकांत हिरे तर महिला तालुकाध्यक्ष पदी सविता अहिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
जी.एस.हायस्कूलच्या लायन्स हॉल मध्ये संघटनेची बैठक संपन्न झाली.यावेळी राज्य संघटक संजय सोनार कळवाळीकर, जिल्हा नेते विपीन पाटील,राकेश पाटील व डॉ. कुणाल पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली.यावेळी व्यासपीठावर वाल्मिक मराठे,आनंदराव अहिरे, पुरुषोत्तम पाटील, व्ही.टी. पाटील, सुशील भदाणे,विशाल वाघ,चंद्रकांत कंखरे,आशिष पवार, किशोर माळी आदी उपस्थित होते. जिल्हा प्रतिनिधी म्हणून डॉ.कुणाल पवार व किरण सनेर यांच्या निवडीचा प्रस्ताव संमत करण्यात आला.तर तालुका कार्यकारिणीत जयेश शिरसाठ, प्रशांत पवार,मकरंद निळे,गोपाल हडपे, अमोल पाटील,रमेश पाटील, पाकिजा पिंजारी,शरद पाटील, सविता शेळके,प्रतिभा जाधव यांची निवड करण्यात आली.यावेळी शिक्षण, आरोग्य, महसूल,पालिका तसेच इतर विभागाचे डिसीपीएस धारक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उमाकांत हिरे व सविता अहिरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
सविस्तर तालुका कार्यकारणीत सर्व विभागातील डिसीपीएस धारकांना सामावून घेण्यात येणार असून, लवकरच तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात येणार असल्याचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष यांनी सांगितले. सूत्रसंचालन आर.जे. पाटील यांनी तर आभार राहुल पाटील यांनी मानले.