अमळनेर:- तालुक्यात काल १० कोरोना बाधीत आढळले असून यात सर्व रुग्ण शहरात आढळून आले आहेत.
अँटीजेन चाचण्यात ९ तर आरटीपिसिआर चाचण्यात १ असे १० बाधीत काल आढळले. न्यू प्लॉट, राधा कृष्ण नगर, केले नगर, शनी मंदिर गल्ली यासह शहरातील इतर भागात ही रुग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागात काल एकही बाधित आढळून आला नाही. त्यामुळे एकंदरीतच शहरात संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरत असून एकूणच रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मास्क व सामाजिक अंतर राखणे या उपाययोजनांचा परत विसर पडल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. बाजारपेठेत, दुकानात तसेच अनेक शासकीय व खाजगी कार्यालयात कार्यालयात विनामास्क येणाऱ्याची संख्या अजूनही लक्षणीय आहे.