अमळनेर :- तालुक्यातील निम येथील गावठाण जागेवरून बेकायदा गौण खनिज वाहतूक सुरू असून याप्रकरणी लक्ष घालून कारवाईची मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांना केली आहे.
निम परिसरात मोठ्या प्रमाणावर विट भट्ट्या सुरू असून तापी नदी काठावरील गावठाण जागेवरून गौण खनिज (गाळ) दिवसा व रात्री जेसीबी मशिनच्या मदतीने ट्रॅक्टर द्वारे वाहून नेला जात आहे. शासकीय जागेतील गौण खनिज वाहून नेण्याची परवानगी नसताना सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या परवानगीने ही वाहतूक केली जात असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. तरी या प्रकरणी योग्य ती चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे. सदर निवेदनावर ज्ञानेश्वर पाटील, प्रतिभा पाटील, संगीता चौधरी, हिलाल सैंदाणे, एकनाथ कोळी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.