जानवे येथील पाच जणांची न्यायालयाने निर्दोष केली मुक्तता…
अमळनेर:- ग्रामपंचायतीच्या मालकीची जीर्ण इमारत खाली केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातून जानवे येथील पाच जणांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.
तालुक्यातील जानवे येथील ग्रामपंचायतींची इमारत नूतन मराठा संस्थेच्या किसान माध्यमिक विद्यालयास भाड्याने दिली होती. मात्र ही इमारत जीर्ण झाल्याने २०१८ साली २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण झाल्यानंतर गावातील नागरिक सुभाष भिला पाटील, शरद नथु पाटील, हर्षल भटू पाटील, रवींद्र झावरू पाटील, प्रकाश विक्रम पाटील यांनी इमारत जीर्ण झाल्याने कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कुलूप लावले होते. तत्कालीन मुख्याध्यापक राजेंद्र पवार यांनी पाचही जणांविरुद्ध मारहाण व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला होता. हा खटला अमळनेर येथील न्यायालयात सुरू होता. आरोपींतर्फे ॲड एस आर पाटील यांनी युक्तिवाद केला. न्या एस बी गायधनी यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.