खा. शि. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना भीम आर्मीचे निवेदन…
अमळनेर:- येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत बाहेरील जिल्हा अथवा राज्यातून येणाऱ्या मतदारांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंध घालण्याबाबतचे निवेदन अमळनेर भिम आर्मीचे तालुका अध्यक्ष प्रवीण बैसाने यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिले असून त्याची प्रत प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी व राज्याचे आरोग्यमंत्री यांनाही पाठवण्यात आली आहे.
राज्यभर कोरोना सह ओमीक्रोन विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व जन माणसात कोरोनाची पसरलेली भिती पाहता अमळनेर मधील खाशी मंडळाची 23 जानेवारी रोजी होवू घातलेल्या निवडणुकीत बहुतांश मतदार हे मतदानासाठी इतर जिल्हा व पर राज्यातून ही येतील. कोरोनाच्या भयंकर आजारात अमळनेरकर होरपळून निघाले आहेत. परराज्यासह दुसऱ्या जिल्ह्यातील मतदार हे येतील व यामुळे अमळनेरात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या बाहेरून येणाऱ्या मतदारांना येण्यास प्रतिबंध घालावा अथवा मतदान दिनांकाच्या पूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने योजिलेल्या नियमानुसार पंधरा दिवस अगोदर क्वारंटाइन करण्याची सक्ती करावी, असे निवेदनात नमूद केले आहे. असे न केल्यास संघटना याविरोधात तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. या आंदोलनात होणाऱ्या परिणामास आपण स्वतः जबाबदार असाल याची जाणीव असावी.तसेच याबाबत घेतलेला निर्णय संघटनेला लिखित स्वरूपात त्वरित कळवावा, अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी भिम आर्मीचे तालुका अध्यक्ष प्रविण बैसाने, कृष्णकांत शिरसाठ, पवन जगताप, आत्माराम अहिरे सह कार्यकर्ते उपस्थित होते.