समस्या सोडविण्याबाबत मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना दिले निवेदन…
अमळनेर:- गेल्या 35 वर्षांपासून रहिवाशी असलेल्या प्रभाग क्र 7 मधील गट नंबर 1751 मधील लक्ष्मीनगर भागातील पाण्याच्या टाकीजवळील भागात भुयारी गटार नसल्याचे निवेदन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना दिले असून मूलभूत समस्या सोडवण्याची मागणी केली आहे.
ढेकू रोड परिसरातील लक्ष्मी नगर मध्ये विविध मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. मात्र लक्ष्मीनगर पाण्याच्या टाकी समोरील भागात व समोरील गल्लीत गट नंबर 1751 मध्ये कुठल्याही नागरी सुविधा जसे भुयारी गटारी, रस्ते व नवी पाण्याची पाईप लाईन उपलब्ध झालेली नाही. लक्ष्मी नगर पाण्याची टाकी समोरील भागात रहिवास साधारणत 30 ते 35 वर्षापासून असून नागरीक नगरपालिका कराचा भरणा नियमितपणे करित आहेत. गटारी नसल्याने सांडपाणी शोष खड्डे भरून रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव, दुर्गंधी वाढून मलेरिया डेंगू यासारखे आजार पसरण्याची दाट शक्यता असुन लक्ष्मीनगर पाण्याच्या टाकी समोरील व मंदिराच्या पाठीमागील भागाचा प्रत्यक्ष सर्वे करून जागेची तपासणी करावी व वंचितांना कायमस्वरूपी मूलभूत नागरी सुविधा पुरविण्यात याव्यात अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी राजू फाफोरेकर यांच्या नेतृत्वाखाली अनिल ठाकूर, एस बी पाटील, भालचंद्र बाविस्कर, रवींद्र मुसळे, केवलसिंग राजपूत, संदीप मोरे, तुषार मोरे, विजय राणे, रवींद्र मुसळे, रतनलाल बिचवे संजय वानखेडे, दीपक बोरसे, प्रल्हाद बोरसे, रवींद्र वानखेडे, सुनील सोनवणे, रामदास पवार, अरुणाबाई पाटील, मनीषा पाटील, उज्वला मोरे, सुनंदा शिरसाठ, गुलाब शिंदे, कविता वानखेडे, रवींद्र वानखेडे, वनिता सिसोदे, सखाराम पाटील, हिंमत चौधरी आदींनी हे निवेदन दिले.