जी २० स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविल्याने मिळाली संधी…
अमळनेर:- येथील सुपूत्र असलेल्या पार्थ महावीर पहाडे याने जी २० स्पर्धेत उल्लेखनीय असे यश मिळविल्याने त्याची पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यासोबत भेट होऊन त्यांच्या हस्ते पार्थचा गौरव करण्यात आला.
पार्थ याचे राजस्थान राज्यातील बी आय टी एस युनिव्हर्सिटी पिलानी येथे बी फार्मसीचे शिक्षण सुरू असून बीआयटीएस युनिव्हर्सिटीने घेतलेल्या जी 20 स्पर्धेत पार्थने गोवा,हैद्राबाद व पिलानी शाखेतुन चौथा क्रमांक प्राप्त केला होता. यानिमित्ताने सुरवातीला त्याचा गौरव भारताच्या युएनओचे चीफ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर बीआयटीएस युनिव्हर्सिटीकडून त्याची भारत सरकारतर्फे आयोजित “जी 20 युनिव्हर्सिटी कनेक्ट फिनाले विथ श्री. नरेंद्र मोदीजी” या समेट करिता निवड होऊन त्यात सहभागी होण्याचा बहुमान पार्थ ला मिळाला. यामुळे त्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सोबत वैयक्तिक भेट होऊन त्यांच्याकडून विशेष अश्या शुभेच्छा देखील पार्थला मिळाल्या. पार्थ हा अमळनेर येथील आर्किटेक्ट महावीर पहाडे व वैशाली पहाडे यांचा सुपूत्र असून या बहुमानाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.