नऊशे भाविकांनी घेतला अन्नदानाचा लाभ….
अमळनेर:- येथील लायन्स क्लब अमळनेर व मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे राजेश पन्नालाल जैन यांच्या सहकार्याने ३ सप्टेंबर रोजी अन्नदान करण्यात आले.
सुमारे नऊशे भाविकांनी पोहे जलेबीचा मंगळग्रह मंदिर येथे लाभ घेतला. या अन्नदान कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन डिगंबर महाले व एमजेएफ विनोद अग्रवाल होते.राजेश जैन यांचे लायन्स क्लबचे अध्यक्ष दिलीप गांधी यांनी सर्व सभासदांनी आभार मानले. यावेळी कार्यक्रमात क्लबचे सचिव दिनेश मणियार, डॉ रविंद्र जैन,प्रदीप जैन, उदय शाह,विनोद अग्रवाल, जितेंद्र जैन, अजय हिंदुजा, जितेंद्र पारख, अनिल रायसोनी, प्रशांत सिंघवी, हरिकृष्ण सोनी, राजू नांढा उपस्थित होते.