विविध संघटनांनी प्रांतांना निवेदन देत गुलुम मोर्चा काढण्याचा दिला इशारा…
अमळनेर:- आदिवासी जमातीचे जातीचे दाखल इतर कुठल्याही समाजाला देऊ नये यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी समजातर्फे गुलुम मोर्चा काढण्याचा इशारा विविध संघटनांनी दिला आहे. यासंदर्भात प्रांताधिकारी यांच्या मार्फत आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांना निवेदन देण्यात आले.
प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी हा समाज जल, जंगल जमिन यांचे पूजनीय आहे. व या धर्तीचे मूळ मालक असून सर्वांच्या आधी या धर्तीवर आदिवासी समाज अस्तित्वात आहे. भारतीय राज्य घटनेने आदिवासी समाजाचे जातीचे दाखले त्यांच्या चालीरिती रिवाजानुसार व संस्कृतीनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली देण आहे. तरी सध्या हे जातीयवादी सरकार आदिवासीच्या जातीच्या दाखल्यांमध्ये इतर समाज घुसवत आहे. तरी इतर जातीच्या लोकांना आमच्या समाजात समाविष्ट करु नये अशी मागणी गुलुम मोर्चाच्या माध्यमातून आदिवासी जमातीचे जातीचे दाखले इतर कुठल्याही समाजाला देऊ नये, पारोळा तालुक्यातील मोंढाळे पिंप्री येथील आदिवासीवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींना गावातून तडीपार करण्यात यावे. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल येथील कार्यालयाची शाखा अमळनेर येथे झाली पाहिजे. आदिवासी समाजाची इंदिरा सरकारच्या वेळेची खावटी कर्ज ५००० रुपयांची वाढ करुन घरपोच धान्य मिळाले पाहिजे. आदिवासी समाजाला प्रत्येक गांवामध्ये स्मशान भूमी मोजून मिळाली पाहिजे. शहरातील व ग्रामीण भागातील अतिक्रमण घरकुल स्थानिक रहिवासी आदिवासी यांच्या नावावर विनामुल्य झाली पाहिजे. सालाबादाप्रमाणे आदिवासीची अस्मिता रावन दहन प्रथा कायमची बंद झाली पाहिजे आदिवासी समाजाची खेडत असलेली जमीनी आदिवासीच्या नावावर झाली पाहिजे. शहरी भागात शबरी घरकुल योजना राबविली गेली पाहिजे आदी प्रमुख मागण्या करण्याात आल्या आहेत.
निवेदनावर महा. राज्य एकलव्य सेना प्रमुख राज साळवी, राज्य महिला एकलव्य सेना प्रमुख सुमनताई साळवी, भिल समाज विकासमंचचे दीपक अहिरे, बाळासाहेब सैंदाणे, गुलाब वारस, आनंद पवार, महा. दंडनायक जिल्हाध्यक्ष रमेश सोनवणे, एकलव्य सेना शहर अध्यक्ष धनराज मालचे, सल्लागार विनायक सोनवणे, एकलव्य संघटना तालुकाध्यक्ष कविता पवार, महा. दंडनायक प्रदेश सचिव विकास सोनवणे,एकलव्य सेना शहर सचिव आप्पा दाभाडे, महादंडात्मक तालुकाध्यक्ष नाना पवार, आदिवासी सुरक्षा ग्रुप अध्यक्ष रवी वाघ, रावसाहेब पवार, नरेश चव्हाण, आचा बहिराम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.