नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापनेला वितरणाचा झाला शुभारंभ…
अमळनेर:- तालुक्याचे ग्रामदैवत तथा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सती माताजी यांची पहिली प्रतिमा सतीमाता भक्त महेश राजपुत यांनी साकारली असून या प्रतिमेचे अनावरण व वितरणाचा शुभारंभ नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आला.
सुरवातीला 200 प्रतिमा महेश राजपूत यांनी स्वखर्चातून साकारल्या असून अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे.अमळनेर पासून चार किमी अंतरावर असलेल्या चांदणी कुर्हे गावाजवळ रेल्वे रुळाच्या मधोमध सती मातेचे मंदिर असून गेल्या काही वर्षात या मंदिरावर भाविकांची मोठी श्रद्धा झाली आहे.आतापर्यंत मातेची एकही प्रतिमा उपलब्ध नसताना मातेचा फोटो घराघरात पोहोचावा यासाठी महेश राजपूत यांनी महेंद्र पाटील यांच्या सहकार्याने अतिशय सुंदर प्रतिमा साकारली असून या प्रतिमा माता भक्तांना ते मोफत देणार आहेत. घटनस्थापनेच्या शुभमुहूर्तावर मंदिरावर झालेल्या कार्यक्रमात शहरातील मान्यवर आणि सर्व विश्वस्थ मंडळाच्या उपस्थितीत फोटोचे अनावरण होऊन सर्व विश्वस्थ आणि सेवेकऱ्यांना प्रतिमा देऊन वितरणाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी उपस्थित नपचे प्रशासन अधिकारी संजय चौधरी यांनी या धार्मिक उपक्रमाचे कौतुक करत या उपक्रमास इतर भाविकांनी देखील हातभार लावून जास्तीत जास्त घरात मातेच्या प्रतिमा पोहोचवाव्यात अशी विनंती केली. तर सर्वांचे महेश राजपूत यांचे आभार मानले. यावेळी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, नपचे सोमचंद संदानशिव,उमेश लाठी, जयदीप राजपूत,रघुनाथ पाटील, तेजेंद्र जामखेडकर, अशोक मिश्रा,लिओ क्लब अध्यक्ष प्रणित झाबक, सीआरपीएफ जवान योगेश पवार, अतुल राजपुत,डॉ संजय शाह, डॉ सुमित पाटील, प्रशांत लंगरे, हार्दिक खिलोसिया, प्रतीक शाह केयुर ठक्कर यासह असंख्य भक्तगण व न्यू प्लॉट परिसर विकास मंचचे सदस्य उपस्थित होते.