अमळनेर:- तालुक्यातील हेडावे शिवारात दि 12 रोजी झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्याची लिंबूची संपूर्ण बाग उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यास मोठा आर्थिक फटका बसला आहे.
हेडावे शिवारात डॉ.हिम्मत सूर्यवंशी यांची शेतजमीन असून याठिकाणी त्यांनी मोठया मेहनतीने लिंबूची बाग साकारली होती तसेच इतरही झाडांची लागवड आणि सुंदर सुशोभीकरण त्यांनी केले असल्याने हे शेत शिवार निसर्गरम्य पिकनिक स्पॉट ठरले होते. सध्या लिंबू ला चांगला बहार देखील आला होता,चांगल्या भावामुळे कुठेतरी उत्पन्नाची आशा त्यांना असताना आलेल्या वादळी पावसाने सारेच झाड उन्मळून पडल्याने संपूर्ण बागच उध्वस्त झाली आहे.यामुळे मोठा आर्थिक फटका या युवा शेतकऱ्यास बसल्याने सदर नुकसानीचे तातडीने पंचनामे होऊन शासनाकडून नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे.