अमळनेर:- गुरुवारी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी मोठी गर्दी उसळली होती. त्यात सरपंच पदासाठी १७ अर्ज तर सदस्य पदासाठी ११७ अर्ज दाखल झाले आहेत.
आज शुक्रवार शेवटचा दिवस असून आजही मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होतील. ऑनलाईन अर्ज दाखल करून ते अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा करत आहेत. मोठ्या प्रमाणावर पुरुष व महिला गुरुवारी पॅनलसहित अर्ज सादर करण्यासाठी जथ्याने येत होते. तालुक्यात एकूण १४ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू आहे.